Translate

Wednesday

गोरगरिबांचा कैवारी खानदेशची शान…गिरीषभाऊ महाजन



Related image
Girish Mahajan 




महाआरोग्यदूत…जलदुत…संकमोचक…जनसेवक…

गोरगरिबांचा कैवारी खानदेशची शान…गिरीषभाऊ महाजन…ही शिवरायांच्या महाराष्ट्राची जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे…आधी लगीन कोंढण्याचं…
विरोधक हो..!गिरिषभाऊंचा नुसता विरोध करायचा म्हणून विरोध करायचा नसतो..?
कोल्हापूर सांगली परिसरात मोठ्याप्रमाणात मुसळधार पावसाने थैमान घातले.त्यामुळे या दोन्ही परिसरात महाजलप्रलय आला आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला,. त्यावर तात्काळ निर्णय घेऊन मुख्यसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेला स्थगिती देत आपला मोर्चा कोल्हापूर सांगली महापुरग्रस्त भागात मदतकार्यासाठी वळवला व हे पुरातील जीवितहानीचे संकट टाळण्यासाठी त्याची मुख्य जबाबदारी मंत्रीमंडळातील महाराष्ट्राचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्यावर सोपवली. या जलप्रलयात ही गिरीषभाऊंनी संकटमोचन या बिरुदावलीला सार्थ केले. थेट 6 फुटापेक्षा जास्त पाणी असलेल्या पुरात उडी टाकून स्वतःला झोकून देऊन लोकांना मदत केली.
img-20190809-wa0065

मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करण्यासाठी अधिकाऱ्याने व्हिडीओ काढला असतांना त्या व्हिडिओला विरोधकांनी व प्रसारमाध्यमांनी जो वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला तो अतिशय निंदनिय व लज्जास्पद आहे. विरोधाची एवढी हीन पातळी गाठावी हे अपेक्षित नव्हते पण असो म्हणतात ना.! हीन व्यक्ती तितक्याच हीन प्रवृत्ती.

प्रसारमाध्यमांनी तरी डोळे उघडून गिरीषभाऊंच्या महतकार्यालाही लोकांपर्यंत पोहचवावे…या आधीही गिरीषभाऊंनी नाशिक जिल्ह्यातील चांदोरी सायखेड्याच्या पुराच्या पाण्यात स्वतः उतरून लोकांना बाहेर काढले त्यामुळेच तर त्यांचे कार्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोल्हापूर सांगली मोहीम सोपविली. गेल्या दोन तीन दिवसांपासून गिरीषभाऊ कोल्हापूर सांगली भागात ठाण मांडून आहेत. एन.डी.आर.एफ.च्या जवानांबरोबर स्वतः पाण्यात उतरून लोकांना मदत करताय. मात्र घरात बसलेलले विरोधक त्यांना विरोध करताय ठीक आहे, ते त्यांचे कामच आहे म्हणा. पण प्रसारमाध्यमांनी तरी आपले स्वतःचे डोळे उघडून पहावे व स्वतःचे कर्तव्य करावे.

गिरीषभाऊ महाजन नावाची एवढी काय धास्ती तुम्हाला..? अरे नुसता विरोध करायचा म्हणून करायचा नसतो.. त्यालाही काही कारण असावे लागते. विरोधकांनी त्यांच्या पक्षातील एकतरी नेता असा दाखवून द्यावा.! ज्याने प्रत्यक्ष पुराच्या पाण्यात उतरून लोकांना मदत केलेली असावी. विरोधक हो, निदान चांगल्या कामाला तरी चांगले म्हणण्याची प्रवृत्ती दाखवावी. स्वतःच्या पक्षातले लोक पक्ष सोडून जाताय म्हणूनच की काय विरोधक बावरून हादरून अश्या माथेफिरू सारख्या प्रतिक्रिया देताय अस वाटायला लागलंय.

तुम्ही कितीही विरोध केला तरी ही शिवरायांच्या महाराष्ट्राची ११ कोटी मायबाप जनता प्रत्येक माध्यमातून गिरिषभाऊंचे कार्य पहातेय.. तिचा आशीर्वाद सदैव गिरिषभाऊंच्या पाठीशी आहे. कितीही करा तुम्ही हल्ला मात्र मजबूत आमच्या गिरिषभाऊंचा किल्ला…

मुख्य मार्गदर्शक :- श्री प्रमोद परदेशी (प्रदेशाध्यक्ष नमो ग्रुप फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य)
लेखक :- शिवशाहीर सुनिल छोटू पवार  (प्रदेशप्रवक्ता :- नमो ग्रुप फाउंडेशन,महाराष्ट्र)
                                          संपर्क – ८७९३२४८५५५